मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

रीती वर्तमानकाळ

डाउनलोड रीती वर्तमानकाळ

नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

व्याकरणिक विशेष : {रीती वर्तमानकाळ}

क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. एखादी क्रिया वर्तमानकाळात नेहमी घडत असेल किंवा वर्तमानकाळात त्या क्रियेची पुनरावृत्ती संदर्भित होत असेल तर त्यासाठी रीती वर्तमानकाळातील क्रियारूप वापरले जाते. उदाहरण : ‘मी रोज कामाला जातो’ या प्रमाण मराठीतील वाक्यात ‘जातो’ ह्या क्रियापदावरुन ही क्रिया नेहमी घडते आणि वर्तमानकाळात ह्या क्रियेची पुनरावृत्ती होते हे दिसते.



१.0 व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या बोलींमध्ये रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी सर्वेक्षणात तीन प्रकारच्या संरचना आढळल्या आहेत : (१) [क्रियापद-त-लिंग,वचन,पुरुष सुसंवाद]; (२) [क्रियापद-स.वचन सुसंवाद]; (३) [क्रियापद-ता]. सापडलेल्या तिन्ही प्रकारच्या संरचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.



१.१ पर्यायी रचना १ : [क्रियापद-त-लिंग,वचन,पुरुष सुसंवाद]

रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त-लिंग,वचन,पुरुष सुसंवाद] ही संरचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली.



१.१.१ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. रत्नागिरी, गाव मालगुंड, स्त्री३९, कुणबी, १२वी)
ती कामाला ज़ाते
ti kamala jate
ti kam-a-la ja-t-e
she work-OBL-DAT go-IPFV-3SGF
She goes to work.
१.१.२ उदाहरण (जि. ठाणे, ता. अंबरनाथ, गाव उसाटणे, पु१९, बौद्ध, एफ.वाय.बी.ए.)
मराटीच़ बोलतो मी जास्तं
məraṭic bolto mi ǰastə
məraṭi-c bol-t-o mi ǰastə
Marathi-EMPH speak-IPFV-1SGM I more
I speak in Marathi most of the time.

१.२ पर्यायी रचना २ : [क्रियापद-स.वचन सुसंवाद]

रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-स.वचन सुसंवाद] ही संरचना राज्यातील ५ जिल्ह्यांत आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :



जिल्हा तालुका व गाव
जळगाव जळगाव - धामणगाव, चाळीसगाव - दहिवद
धुळे धुळे - सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - शिंगावे व बोराडी, साक्री - धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक सटाणा - दरेगाव, मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.)
पालघर डहाणू - वेती


१.२.१ उदाहरण (जि. नंदुरबार, ता. नंदुरबार, गाव धानोरा, पु४२, मातंग, ६वी)
एक पोर्‍या धाविले शाळामा ज़ा
ek porya dʰawile šaḷama jas
ek porya dʰawi-le šaḷa-ma ja-s
one son.OBL tenth-LOC school-LOC go-IPFV.SG
One of my sons goes to class 10 in school.

१.२.२ उदाहरण (जि. धुळे, ता. धुळे, गाव खोरदड, पु६८, कुणबी-पाटील, ८वी)
ते बी आयरानिमास बोलतस
te bi ayranimas boltəs
te bi ayrani-ma-s boltəs
they PRT Ahirani-LOC-EMPH speak-IPFV.PL
They too speak in Ahirani.

१.३ पर्यायी रचना ३ : [क्रियापद-ता]

रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-ता] ही संरचना राज्यातील ३ जिल्ह्यांत आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :



जिल्हा तालुका व गाव
कोल्हापूर चंदगड - कोदाळी
सिंधुदुर्ग दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे
रत्नागिरी राजापूर - कंभवडे


१.३.१ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. मालवण, गाव दांडी, पु७२, गाबीत, ३री)

आमी त्याला काय मनता देवमासा
ami tyala kay mənta dewmasa
ami tya-la kay mən-ta dewmasa
we.EXCL he.OBL-ACC what say-IPFV devmasa
We call it devmasa.

१.३.२ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. कुडाळ, गाव कुडाळ, पु६०, कुंभार, अशि‍क्षीत)
पन आता जास्तं पीक येता
pən ata ǰastə pik yeta
pən ata ǰastə pik ye-ta
but now more crop come-IPFV
Now we get more crops/we get a better harvest.